घटनेला अभिप्रेत असलेले धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ नागरिक विरुद्ध संघाला अभिप्रेत असलेले संकुचित वर्चस्ववादी हिंदू असा हा लढा आहे!
गुरू गोळवलकर यांना अभिप्रेत असलेलं नागरिकत्व म्हणजे ‘अल्पसंख्याक हिंदूं’च्या मेहरबानीवर अल्पसंख्य समाजाने राहावे व सवर्णांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून दलित, आदिवासींनी राहावे हाच विचार, व्यवहार सर्वांवर लादण्याचे ‘राजकारण’ आहे. समरसता विरुद्ध समता, असा खरा संघर्ष आहे. घटनेला अभिप्रेत असलेले धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ नागरिक विरुद्ध संघाला अभिप्रेत असलेले संकुचित वर्चस्ववादी हिंदू असा हा लढा आहे.......